पूरग्रस्त भागात स्वच्छतेसाठी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:27 IST2021-07-28T04:27:09+5:302021-07-28T04:27:09+5:30
सांगलीत पूरग्रस्त भागात युवक काँग्रेसतर्फे स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते सहभागी झाले. लोकमत ...

पूरग्रस्त भागात स्वच्छतेसाठी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सरसावले
सांगलीत पूरग्रस्त भागात युवक काँग्रेसतर्फे स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते सहभागी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनानुसार युवक काँग्रेसतर्फे पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. जिल्हाध्यक्ष नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बसस्थानक परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कोल्हापूर रस्ता आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. पूरस्थिती पूर्णत: संपेपर्यंत शहरातील विविध भागांत दररोज मोहीम सुरू ठेवणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. मिरजेतील पूरग्रस्त भागातही स्वच्छता केली जाणार आहे. मोहिमेत मंगेश चव्हाण यांच्यासह संभाजी पाटील, माजी नगरसेवक किशोर लाटणे, विजय आवळे, नामदेव चव्हाण, सुहेल बलबंड, स्वप्नील मिरजे, सनी धोत्रे, सागर काळे, प्रशांत अहीवळे, शरीफ सय्यद, प्रथमेश जाधव, विक्रम घाटगे, जोएल जाधव, तौफिक शिकलगार, किरण देवकुळे, रोहन भोरे, राहुल वायदंडे, रईस गोकाक, उदय पाटील, अमित पाटील आदींनी भाग घेतला.