युवक काँग्रेसची प्रत्येक गावात शाखा स्थापणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:19 IST2021-06-20T04:19:27+5:302021-06-20T04:19:27+5:30
ओळी - राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसच्या वतीने दोनशे कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी मंगेश चव्हाण, ...

युवक काँग्रेसची प्रत्येक गावात शाखा स्थापणार
ओळी - राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसच्या वतीने दोनशे कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी मंगेश चव्हाण, संदीप जाधव, सुधीर जाधव, वैभव पवार, प्रमोद जाधव, संभाजी पाटील, राजू वलांडकर, योगेश राणे, सुहेल बलबंड, आशिष चौधरी, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : युवकांना राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक गावात युवक काँग्रेसची शाखा स्थापन करणार आहे. या माध्यमातून युवकांची प्रत्येक समस्या सोडविली जाईल. युवकांनी मोठ्या संख्येने या प्रवाहात सहभागी व्हावे, असे आवाहन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी केले आहे.
युवक काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची शनिवारी बैठक झाली. यावेळी चव्हाण यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष संदीप जाधव, सुधीर जाधव, वैभव पवार, सुमित गायकवाड, जहीर मुजावर, सुशील गोतपागर, सांगली विधानसभा अध्यक्ष प्रमोद जाधव, संभाजी पाटील, राजू वलांडकर, योगेश राणे, महेश पाटील, जयदीप भोसले, विकास माने, शहराध्यक्ष सुहेल बलबंड, आशिष चौधरी, आदी पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यात युवक काँग्रेसचे जाळे भक्कम करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. आता प्रत्येक युवकासोबत काँग्रेसचा हात असेल, असे सांगत जिल्हाध्यक्ष चव्हाण म्हणाले, देशात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय समस्या आहेत. भाजपकडून युवकांची दिशाभूल करण्यात येत आहे. त्यामुळे युवकांना निश्चित दिशा देण्याची आवश्यकता आहे. यासाठी प्रत्येक गावात युवक कॉँग्रेसची शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाखा स्थापन करण्यात येतील.
जिल्ह्यातील युवकांनी या प्रवाहात यावे. राष्ट्रहिताचा विचार करून राजकीय क्षेत्रात आपला सहभाग नोंदबावा आणि भारताच्या लोकशाहीचा पाया भक्कम करावा, असेही चव्हाण म्हणाले.
चौकट :
दोनशे कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू
काँग्रेसचे माजी अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील २००हून अधिक गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोरोना संकटामुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. हे लक्षात घेत गोरगरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे, असे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.