पत्नीशी भांडणातून तरुणाची आत्महत्या

By Admin | Updated: May 23, 2014 17:42 IST2014-05-22T00:34:20+5:302014-05-23T17:42:09+5:30

मिरजेतील प्रकार : पत्नी, सासर्‍याविरुध्द तक्रार

Youth commits suicide with wife | पत्नीशी भांडणातून तरुणाची आत्महत्या

पत्नीशी भांडणातून तरुणाची आत्महत्या

 मिरज : पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागातून मोअज्जम मोहंमदरफिक मलंग (वय २९) या तरुणाने चक्क विष प्राशन करून पोलीस ठाणे गाठले. त्याची अवस्था पाहून पोलिसांनी त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. सेंट्रिंग काम करणारा मोअज्जम मलंग हा विशाळगड येथून मिरजेत पत्नीच्या गावी येऊन राहिला होता. दारूच्या व्यसनामुळे पत्नी व सासर्‍याशी त्याचे पटत नव्हते. रविवारी रात्री भांडण झाल्याने पत्नीने त्याच्याविरुध्द पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी सोमवारी सकाळी मोअज्जम यास तक्रारीबाबत पोलीस ठाण्यात पाचारण केल्यानंतर तो विषारी औषध प्राशन करूनच पोलीस ठाण्यात गेला. पत्नी व सासर्‍याच्या त्रासाने मी विष प्राशन केले असून, घरात चिठ्ठी लिहून ठेवल्याचे त्याने सांगताच पोलिसांची धावपळ उडाली. मोअज्जम यास पोलिसांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. पत्नी व सासर्‍याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची त्याची चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. त्याच्या वडिलांनी मुलाच्या मृत्यूप्रकरणी त्याची पत्नी व सासर्‍याविरुध्द शहर पोलिसांत तक्रार दिली आहे. (वार्ताहर)

Web Title: Youth commits suicide with wife