गिरगाव येथे मोबाईलसाठी तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:06 IST2020-12-05T05:06:49+5:302020-12-05T05:06:49+5:30
उमदी : वडिलांनी नवीन मोबाईल घेऊन देण्यास नकार दिल्याने गिरगाव (ता. जत) येथील तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

गिरगाव येथे मोबाईलसाठी तरुणाची आत्महत्या
उमदी : वडिलांनी नवीन मोबाईल घेऊन देण्यास नकार दिल्याने गिरगाव (ता. जत) येथील तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शंकर निगप्पा मांग (वय २२) असे त्याचे नाव आहे. याबाबत उमदी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
शंकर मांग हा गिरगाव येथे आपल्या आई-वडिलांना शेतीकामात मदत करत होता. गेल्या अनेक दिवसांपासून तो वडिलांकडे नवीन मोबाईल घेऊन देण्याची मागणी करत होता. गुरुवारी सकाळी पुन्हा वडिलांना त्याने मोबाईल घेऊन देण्यास सांगितले. मात्र वडिलांनी नकार दिला व ते कामानिमित्त घरातून बाहेर पडले. त्यानंतर सकाळी ९ च्या दरम्यान शंकरने घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच उमदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उमदी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. मृताचे वडील निगप्पा लकाप्पा मांग यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करत आहेत.