प्रेमप्रकरणातून इस्लामपुरात युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:15 IST2021-02-20T05:15:07+5:302021-02-20T05:15:07+5:30
याबाबत श्रीमती जयश्री धनंजय शिंदे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जयप्रकाश काका सोनवणे आणि चंद्रकला सोनवणे (दोघे रा. ...

प्रेमप्रकरणातून इस्लामपुरात युवकाची आत्महत्या
याबाबत श्रीमती जयश्री धनंजय शिंदे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जयप्रकाश काका सोनवणे आणि चंद्रकला सोनवणे (दोघे रा. म्हसवड, जि. सातारा) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी नोंद केला आहे.
विक्रांत याचे २०१६ मध्ये म्हसवड येथे प्राजक्ताशी लग्न झाले होते. त्यांना चार वर्षाचा मुलगाही आहे. मृत विक्रांत याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. त्यावरून दोघांमध्ये खटके उडत होते. प्राजक्ताचे आई-वडील विक्रांतशी वरचेवर भांडण करायचे. तू आत्महत्या कर, नाही तर विद्याला जिवंत ठेवणार नाही, अशी दमदाटी करायचे. या त्रासाला कंटाळूनच विक्रांतने आत्महत्या केल्याचा आरोप आई जयश्री शिंदे यांनी केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी विक्रांतने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत जयप्रकाश सोनवणे, चंद्रकांत सोनवणे यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे नमूद केले आहे. पोलीस उपनिरीक्षक समाधान लवटे अधिक तपास करीत आहेत.