सांगलीत दारूसाठी तरुणास लुटणारे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:27 IST2021-04-02T04:27:53+5:302021-04-02T04:27:53+5:30
सांगली : शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या एका दारू दुकानात दारूसाठी पैसे मागत मारहाण करीत पाच हजार रुपये जबरदस्तीने ...

सांगलीत दारूसाठी तरुणास लुटणारे अटकेत
सांगली : शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या एका दारू दुकानात दारूसाठी पैसे मागत मारहाण करीत पाच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेण्यात आले. याप्रकरणी शिवओत जगरूप कश्यप (रा. सांगलीवाडी) याने संजयनगर पोलिसांत अमोल नाना सदामते (३२) व रामदास रघुनाथ सदामते (३०, दोघेही रा. चिंतामणीनगर झोपडपट्टी) यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी कश्यप कागदी पुठ्ठ्यांच्या खरेदीचा व्यवसाय करतो. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास तो औद्योगिक वसाहतमधील स्वामी यांच्या देशी दारू दुकानात कागदी पुठ्ठे आहेत का याची विचारणा करण्यासाठी गेला होता. यावेळी तिथे संशयित दारू पिण्यासाठी आले होते. यावेळी संशयितांनी त्याच्याकडे पैशाची मागणी केली. कश्यपने पैसे न दिल्याने त्यास मारहाण करत त्याच्या खिशातील पाच हजार रुपये काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीनुसार संजयनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.