शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

तू ये रे पावसा... व्याकुळ बळीराजा देतोय हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 11:52 IST

उन्हाच्या आगीने भाजून निघालेली धरणी, फोंड्या माळरानावर चारा आणि पाण्यासाठी हंबरडा फोडणारी जितराबं, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी आ-वासून आभाळाकडे आस लावून बसलेला बळीराजा खरिपाच्या पेरणीसाठी  तू ये रे पावसा...म्हणून आर्त हाक देत आहे. हजारो हेक्टर क्षेत्रावरील पेरणी खोळंबली आहे.

ठळक मुद्देतू ये रे पावसा... व्याकुळ बळीराजा देतोय हाककवठेमहांकाळ तालुका : हजारो हेक्टरवरील खरिपाची पेरणी रखडली

अर्जुन कर्पेकवठेमहांकाळ : उन्हाच्या आगीने भाजून निघालेली धरणी, फोंड्या माळरानावर चारा आणि पाण्यासाठी हंबरडा फोडणारी जितराबं, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी आ-वासून आभाळाकडे आस लावून बसलेला बळीराजा खरिपाच्या पेरणीसाठी  तू ये रे पावसा...म्हणून आर्त हाक देत आहे. हजारो हेक्टर क्षेत्रावरील पेरणी खोळंबली आहे.वर्षानुुवर्षे कवठेमहांकाळ तालुका हा दुष्काळाच्या आगीत होरपळत आहे. रखडलेल्या सिंचन योजना, त्यातून होणारा अनियमित पाणीपुरवठा, आटलेले पाण्याचे स्रोत, गतवर्षी असमाधानकारक, अत्यल्प झालेला पाऊस, यामुळे चालूवर्षी दुष्काळाचे गर्द संकट तालुक्यावर आले आहे.जून उजाडला तरी मान्सूनने अद्याप डोळा उघडलेला नाही. तलाव कोरडे पडल्याने शेतकरी तलावातूनही पाणी उचलू शकत नाही. पावसाळा ऋतू सुरू झाला तरी, टँकरच्या खेपा वाढतच आहेत. जनावरांच्या ४ चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. अद्यापही छावण्यांची मागणी वाढतच आहे. स्वत: जगायचे, कुटुंब जगवायचे, की जनावरे जगवायची? या चक्रव्यूहात शेतकरी सापडला आहे. शेतकऱ्यावरील आर्थिक कर्जाचे ओझे वाढतच चाललेले आहे. पाऊस-पाणी नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.कवठेमहांकाळ तालुक्यात ७५ टक्के शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. खरिपाच्या हंगामात तालुक्यात ज्वारी, बाजरी, मका, तृणधान्य, मूग, उडीद, तूर, इतर कडधान्ये, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस आदी पिके पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. परंतु पाऊसच अद्याप सुरू झाला नसल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. आभाळाकडे डोळे लावून बसण्याखेरीज शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय उरलेला नाही.तालुक्यात २२ हजार ४७४ हेक्टर क्षेत्र हे खरिपाखालील पेरणी क्षेत्र आहे. यामध्ये पाण्याविना शेतकरी काहीच करू शकत नाही. कोपलेल्या निसर्गाला, दडी मारलेल्या वरुणराजाला व्याकुळ आणि हतबल बळीराजा, हंबरणारी जनावरे, तापलेली धरणी, रानातील पाखरे ह्यतू ये रे पावसाह्ण म्हणून आर्त हाक मारू लागली आहेत.

 

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलSangliसांगली