‘सागरेश्वर’मध्ये आज आपली शिदोरी - आपले संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:30 IST2021-09-12T04:30:44+5:302021-09-12T04:30:44+5:30
वृक्षमित्र धों. म. मोहिते चॅरिटेबल ट्रस्ट, खानापूर-कडेगाव तालुका साहित्य परिषद व अमृतवेल ग्रामविकास प्रबोधिनी यांनी आयोजन केले आहे. या ...

‘सागरेश्वर’मध्ये आज आपली शिदोरी - आपले संमेलन
वृक्षमित्र धों. म. मोहिते चॅरिटेबल ट्रस्ट, खानापूर-कडेगाव तालुका साहित्य परिषद व अमृतवेल ग्रामविकास प्रबोधिनी यांनी आयोजन केले आहे.
या संमेलनास प्रांताधिकारी संतोष भोर, कोल्हापूर वन्यजीव विभागाचे विभागीय वनाधिकारी विशाल माळी, चिंचणी - वांगीचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार शैलेंद्र पाटील यांना वृक्षमित्र धों. म. मोहिते पर्यावरण पत्रकार, तर पर्यावरण अभ्यासक अजित ऊर्फ पापा पाटील यांना कविवर्य चंद्रकांत देशमुखे पर्यावरण स्नेही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दुसऱ्या सत्रात निसर्गाच्या सान्निध्यात साहित्यिकांची काव्यमैफल रंगणार आहे.
साहित्यिकांच्या स्वयंस्फूर्तीतून हे संमेलन होत असते. कार्यक्रम पत्रिका, सभामंडप, भोजनाची सोय याला फाटा देऊन जेवणाची शिदोरी सोबत घेऊन जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून साहित्यिक सहभागी होतात.
रविवारी सकाळी १० वाजता कार्यक्रम होणार आहे. सु. धों. मोहिते, आनंदराव पाटील, ॲड. सुभाष पाटील, रघुराज मेटकरी, प्रा. विश्वनाथ गायकवाड, मन्सूर जमादार, सदानंद माळी, शांतीनाथ मांगले, अशोक पवार, सतीश लोखंडे
संयोजन करीत आहेत.