पद्माळेत व्हॅलेंटाईन डे दिवशी तरुणांनी केली स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:23 IST2021-02-15T04:23:34+5:302021-02-15T04:23:34+5:30

संजयनगर : देशभरात सर्वत्र व्हॅलेंटाईन डे उत्साहात साजरा होत असताना पद्माळे (ता. मिरज) येथील युवकांनी एकत्र येऊन गावांमध्ये स्वच्छता ...

Youngsters clean Padmala on Valentine's Day | पद्माळेत व्हॅलेंटाईन डे दिवशी तरुणांनी केली स्वच्छता

पद्माळेत व्हॅलेंटाईन डे दिवशी तरुणांनी केली स्वच्छता

संजयनगर : देशभरात सर्वत्र व्हॅलेंटाईन डे उत्साहात साजरा होत असताना पद्माळे (ता. मिरज) येथील युवकांनी एकत्र येऊन गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबविली. या माध्यमातून तरुणांनी आपल्या गावाप्रति प्रेम व्यक्त करून व्हॅलेंटाईन डे वेगळ्या पद्धतीने साजरा केला.

पद्माळे गावच्या योद्धा ग्रुपच्या तरुण युवकांनी सरपंच सचिन जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवली. सकाळी सहा वाजल्यापासून दुपारपर्यंत स्वच्छता मोहीम सुरू होती. सर्व युवक मुस्लिम दफनभूमीमध्ये एकत्र आले होते. त्याठिकाणी असलेल्या परिसरातील सर्वत्र स्वच्छता करून त्याठिकाणी रंगरंगोटी केली.

यावेळी ग्रुपचे संस्थापक अभिजित जगदाळे, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष आणि सचिव दस्तगीर मुल्लाणी उपस्थित होते. सरपंच सचिन जगदाळे म्हणाले, व्हॅलेंटाईन डे सर्वत्र साजरा होत असताना तरुण पिढीने गावात स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला, हे कौतुकास्पद आहे. इथून पुढेही गावामध्ये सर्वत्र स्वच्छता मोहीम करून गाव सुंदर ठेवले जाईल, असे मत जगदाळे यांनी व्यक्त केले.

फोटो-१४दुपटे१

फोटो ओळी : पद्माळे (ता. मिरज) येथे व्हॅलेंटाईन डे निमित्त तरुणांनी गावात स्वच्छता करून रंगरंगोटी केली. छाया : सुरेंद्र दुपटे

Web Title: Youngsters clean Padmala on Valentine's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.