येलुर येथे लग्न ठरत नसल्याने तरुणीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:34 IST2021-07-07T04:34:17+5:302021-07-07T04:34:17+5:30
येलूर : येलूर (ता. वाळवा) येथे लग्न ठरत नसल्याच्या नैराश्यातून उच्चशिक्षित तरुणीने राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

येलुर येथे लग्न ठरत नसल्याने तरुणीची आत्महत्या
येलूर : येलूर (ता. वाळवा) येथे लग्न ठरत नसल्याच्या नैराश्यातून उच्चशिक्षित तरुणीने राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार, ६ रोजी सकाळी सात ते दहा दरम्यान घडली. निशा प्रल्हाद गायकवाड (वय २८) असे मृत तरुणीचे नाव आहे. याबाबत कुरळप पाेलीस ठाण्यात नाेंद झाली आहे. निशा उच्चशिक्षित असून गेल्या काही वर्षांपासून कुटुंबीय तिच्या विवाहाच्या प्रयत्नात हाेते. तरीही लग्न ठरत नसल्याने निशा निराश हाेती. मंगळवारी सकाळी लवकर उठून ती आपल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर गेली. बराच वेळ ती खाली न आल्याने तिची आई वरील मजल्यावर गेली. या वेळी निशाने लोखंडी अँगलला ओढणी बांधून गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. याबाबत प्रणव प्रल्हाद गायकवाड यांनी कुरळप पोलीस ठाण्यास फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस शिपाई सुरेश पाटील करत आहेत.