मिरजेत प्रेमप्रकरणातून तरुणीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:30 IST2021-08-12T04:30:12+5:302021-08-12T04:30:12+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मिरज : मिरजेत प्रेमप्रकरणातून विषारी इंजेक्शन घेऊन आम्रपाली सतीश कांबळे (वय २०) या तरुणीने मंगळवारी सायंकाळी ...

मिरजेत प्रेमप्रकरणातून तरुणीची आत्महत्या
लाेकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरजेत प्रेमप्रकरणातून विषारी इंजेक्शन घेऊन आम्रपाली सतीश कांबळे (वय २०) या तरुणीने मंगळवारी सायंकाळी आत्महत्या केली. तिने मृत्युपूर्व लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
मिरजेत मराठे मिल चाळ येथे रमामाता आंबेडकर कॉलनीत ही घटना घडली. आम्रपाली कांबळे खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होती. ओळखीतील एका तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते. याची माहिती कुटुंबाला मिळाल्यानंतर त्यांनी दोघांच्या लग्नाला होकारही दिला होता; मात्र तिने सोमवारी घरात विषारी इंजेक्शन स्वतःला टोचून घेतले. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांना तिला उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. यातून आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तथापि प्रेमप्रकरणातूनच हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत गांधी चौक पोलीस अधिक तपास करत आहेत. अचानक घडलेल्या या प्रकाराने कुटुंबीयांचा आक्रोश सुरू होता.