तरुणांनी नवे उद्योगधंदे उभारावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:09 IST2021-01-13T05:09:02+5:302021-01-13T05:09:02+5:30

घाटनांद्रे/वार्ताहर : तरुणांनी नोकरीच्या मागे लागून वेळ खर्ची घालण्यापेक्षा छोटे्-मोठे उद्योगधंदे उभे करून नोकऱ्या निर्माण कराव्यात, असे आवाहन राष्ट्रवादीचे ...

Young people should start new businesses | तरुणांनी नवे उद्योगधंदे उभारावेत

तरुणांनी नवे उद्योगधंदे उभारावेत

घाटनांद्रे/वार्ताहर : तरुणांनी नोकरीच्या मागे लागून वेळ खर्ची घालण्यापेक्षा छोटे्-मोठे उद्योगधंदे उभे करून नोकऱ्या निर्माण कराव्यात, असे आवाहन राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर. आर. (आबा) पाटील यांनी केले. कवठेमहांकाळ एमआयडीसीमध्ये ‘शिंदे इंडस्ट्रीज’ या फर्मच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी किर्लोस्कर कंपनीचे असोसिएट उपाध्यक्ष पी. एम. कुलकर्णी होते.

रोहित पाटील म्हणाले की, कोरोनासारख्या घातक महामारीमुळे उदयोगधंदयालाही मोठा फटका सहन करावा लागत आहे. यातून अनेकजण बेरोजगार झाले. पण येथेच न थांबता तरुणांनी नवनवीन उदयोगधंदयाची कास धरून रोजगार निर्मिती करावी व स्वत:बरोबर इतरांच्याही जडणघडणीचे हिस्सेदार बनावे.

कुलकर्णी म्हणाले की, नोकरीपेक्षा उदयोगधंदयात फार मोठे करिअर असते, हे टाटा, किर्लोस्कर या उद्योगपतींनी दाखवून दिले आहे.

दुष्काळी ग्रामीण भागातील युवक नोकरीसाठी स्थलांतरित होत असताना, अमित शिंदे यांनी ग्रामीण भागात थांबून उद्‌योग उभारणे कौतुकास्पद असल्याचे युवराज जगताप यांनी सांगितले.

फर्मचे संचालक अमित शिंदे यांनी प्रास्ताविक केले, तर वैभव जमादार यांनी आभार मानले.

(फोटो ओळी:-

कवठेमहांकाळ येथे ‘शिंदे इंडस्ट्रीज’ या फर्मचे फीत कापून उद्‌घाटन करताना रोहित आर. आर. (आबा) पाटील व इतर,

Web Title: Young people should start new businesses