तरुणांनी दुग्ध व्यवसाय अधुनिक पद्धतीने करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:26 IST2021-01-20T04:26:22+5:302021-01-20T04:26:22+5:30

ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील देसाई दुग्ध ॲण्ड मिल्क फूड उद्योगाच्या विस्तारित इमारत उद्घाटन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. नेचर डिलाईट ...

Young people should do dairy business in a modern way | तरुणांनी दुग्ध व्यवसाय अधुनिक पद्धतीने करावा

तरुणांनी दुग्ध व्यवसाय अधुनिक पद्धतीने करावा

ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील देसाई दुग्ध ॲण्ड मिल्क फूड उद्योगाच्या विस्तारित इमारत उद्घाटन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. नेचर डिलाईट ॲण्ड नेचर इन्फ्राचे (कळस, ता. इंदापूर) अध्यक्ष अर्जुन देसाई, ढालगावच्या सरपंच मनीषा देसाई, जिल्हा परिषद सदस्य भगवान वाघमारे, विकास सोसायटी अध्यक्ष मधुकर देसाई, देसाई दूधचे संचालक जनार्धन देसाई, विनायक देसाई, ग्रामपंचायत सदस्य माधवराव देसाई, संजय पाटील उपस्थित होते.

सुमनताई पाटील म्हणाल्या की, दूध व्यवसायामुळे रोजगारनिर्मिती होते. शेतीला आर्थिक हातभार लागलो. देसाई दूध ॲण्ड मिल्क फूडचे संचालक जनार्धन व विनायक देसाई या दोन बंधूंनी अल्पावधीत या दूध व्यवसायात प्रगती केली आहे. ग्रामीण भागातील या व्यवसायातून इतरांसाठी रोजगारनिर्मिती केली आहे.

या वेळी संचालक जनार्धन देसाई म्हणाले की, रोज गाय व म्हशींचे १५ ते २० हजार लीटर दूध संकलन केले जाते. दुग्धजन्य पदार्थनिर्मिती केली जाते. नव्या इमारतीमध्ये अत्याधुनिक तंत्राचा वापर केला आहे. परिसरात लहान दुग्ध संकलन केंद्रे निर्माण केली आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

या वेळी गणेश पवार, नाना देसाई, अमित देसाई, अजित खराडे, धनंजय देसाई, अशोक घोदे, गजबार तांबोळी, आणा हत्तीकर, मनोज देसाई, दिलीप देसाई आदी उपस्थित होते.

फोटो-१९ढालगाव१

Web Title: Young people should do dairy business in a modern way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.