तरुणांनी शिवचरित्र आत्मसात केले पाहिजे : पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:43 IST2021-02-23T04:43:00+5:302021-02-23T04:43:00+5:30
कोकरुड : छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य प्रेरणास्रोत असून तरुणांनी शिवचरित्र आत्मसात केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. ए. ...

तरुणांनी शिवचरित्र आत्मसात केले पाहिजे : पाटील
कोकरुड : छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य प्रेरणास्रोत असून तरुणांनी शिवचरित्र आत्मसात केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. ए. सी. पाटील यांनी केले. ते कोकरुड (ता. शिराळा) येथे आयोजित शिवजयंती उत्सवाप्रसंगी बोलत होते.
यावेळी सरपंच विलास वाघमारे, उपसरपंच पोपट पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण आयुष्य रयतेचे स्वराज्य निर्माण करण्यात घालविले. त्यांचे कार्य वाचल्याने ऊर्जा निर्माण होते. प्रारंभी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी रमेश पाटील, आ. रा. पाटील, तानाजी घोडे, रमेश पोतदार, निवास नांगरे, बबन मोहिते उपस्थित होते.