कुपवाडमध्ये तरुणावर आर्थिक वादातून चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:25 IST2021-03-18T04:25:47+5:302021-03-18T04:25:47+5:30

कुपवाड : शहरातील प्रकाशनगरमधील प्रमोद चंद्रकांत भोसले (वय २८) या तरुणावर मंगळवारी रात्री आर्थिक वादातून चाकू हल्ला करून गंभीर ...

Young man stabbed in Kupwad over financial dispute | कुपवाडमध्ये तरुणावर आर्थिक वादातून चाकू हल्ला

कुपवाडमध्ये तरुणावर आर्थिक वादातून चाकू हल्ला

कुपवाड : शहरातील प्रकाशनगरमधील प्रमोद चंद्रकांत भोसले (वय २८) या तरुणावर मंगळवारी रात्री आर्थिक वादातून चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले. तसेच प्रमोद यांच्या आईलाही धक्काबुक्की केली. या घटनेची कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून चार संशयिताविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितामध्ये ओंकार प्रकाश कुबसद (वय २० रा. सांगली), त्याची आई व दोन अनोळखी अशा चार जणांचा समावेश आहे.

मंगळवारी रात्री प्रमोद भोसले घरात बसला होता. यावेळी संशयित ओंकार कुबसद, त्याची आई, व अन्य दोन जणांनी भोसले यांच्या घरात शिरून तुझा भाऊ अनिल हा आम्हाला पैशांसाठी वारंवार फोन करीत आहे. तुम्ही त्याला सांगा नाहीतर आम्ही त्याला जिवंत सोडणार नाही असे म्हणून चौघांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात सुरुवात केली.

यावेळी संशयितांनी प्रमोद भोसले यांच्या पाठीवर चाकूने वार केले. त्यांच्या आईने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिलाही धक्काबुक्की करून बेदम मारहाण केली. जखमी प्रमोद याच्यावर सांगली येथील सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कुपवाड पोलिसात चौघाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Young man stabbed in Kupwad over financial dispute