मुलगी पाहण्यासाठी गेलेल्या मिरजेतील तरुणाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:22 IST2021-01-09T04:22:30+5:302021-01-09T04:22:30+5:30

याप्रकरणी मीना तुकाराम काळे (रा. सुभाषनगर, हुळळे प्लॉट) आणि रवी शंकर नकाते (रा. मिरज) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल ...

A young man from Miraj who went to see his daughter was beaten | मुलगी पाहण्यासाठी गेलेल्या मिरजेतील तरुणाला मारहाण

मुलगी पाहण्यासाठी गेलेल्या मिरजेतील तरुणाला मारहाण

याप्रकरणी मीना तुकाराम काळे (रा. सुभाषनगर, हुळळे प्लॉट) आणि रवी शंकर नकाते (रा. मिरज) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरजेतील नदिवेस येथील सुदर्शन तोडकर (वय ३२) या तरुणाने लग्नासाठी वधू पाहिजे असल्याने मीना तुकाराम काळे यांच्या वधू-वर सूचक केंद्रात नोंदणी केली होती. विजयनगर येथील संबंधित वधू-वर सूचक केंद्राच्या कार्यालयात मीना व रवी नकाते दोघे काम पाहतात. त्यांनी या तरुणाच्या विवाहासाठी निपाणी येथे एक मुलगी असून, ते स्थळ तुम्हाला दाखवितो, असे सांगून सुदर्शन तोडकर यास विजयनगर येथे बोलावून घेतले.

निपाणी येथे मुलगी पाहण्यास जाण्याच्या आधी गाडीखर्चासाठी १० हजारांची मागणी केली. मात्र, अगोदर पैसे देण्यास नकार दिल्याने वधू-वर केंद्र चालक मीना काळे यांनी शिवीगाळ व रवी नकाते याने काठीने मारहाण केली. पैसे नसतील तर मुलगी पाहायला कशाला आलास, असे म्हणून हाकलून दिल्याची तक्रार सुदर्शन तोडकर यांनी केली आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A young man from Miraj who went to see his daughter was beaten