दुचाकी घसरून कोंगनाेळीचा तरुण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:30 IST2021-08-28T04:30:44+5:302021-08-28T04:30:44+5:30
कवठेमहांकाळ : सराटी (ता. कवठेमहांकाळ) येथे करोली टी ते सलगरे रस्त्यावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात कोंगनाेळी (ता. कवठेमहांकाळ) येथील ...

दुचाकी घसरून कोंगनाेळीचा तरुण जागीच ठार
कवठेमहांकाळ : सराटी (ता. कवठेमहांकाळ) येथे करोली टी ते सलगरे रस्त्यावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात कोंगनाेळी (ता. कवठेमहांकाळ) येथील तरुण जागीच ठार झाला. भारत शिवाजी पाटील (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात गुरुवारी रात्री साडे सात वाजता घडला.
भारत पाटील हा कवठेमहांकाळ येथील एका कापड दुकानामध्ये कामाला होता. गुरुवारी दुपारी १२ वाजताच तो दुकानातून निघून गेला होता. सायंकाळी तो कोंगनाेळीकडे निघाला होता. सराटीजवळ अचानक दुचाकी घसरल्याने ताे रस्त्याकडेला असणाऱ्या पाच फूट खोल खड्ड्यात पडला. अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्याने अतिरक्तस्राव हाेऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.