शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीशी प्रेमसंबंध होते म्हणून दोघा भावांकडून तरुणाचा खून;  पोलीसांकडून तिघांना अटक

By अविनाश कोळी | Updated: January 15, 2024 16:53 IST

याप्रकरणी जावीरसह त्याच्या इतर तिघा मित्रावर गुन्हा दाखल झाला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. 

कुपवाड : बहीणीबरोबर प्रेमप्रकरण असल्याच्या राग मनात धरून बामणोली, दत्तनगर ( ता. मिरज) येथील ओम श्रीधर देसाई (वय १९ रा.दत्तनगर, बामणोली) या युवकाचा संशयित ओंकार जावीरसह अन्य तिघा संशयिताकडून धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. रविवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास दत्तनगर मधील खुल्याजागेत ही घटना घडली. या घटनेची कुपवाड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. याप्रकरणी जावीरसह त्याच्या इतर तिघा मित्रावर गुन्हा दाखल झाला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. 

     गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांमध्ये ओंकार निलेश जावीर (वय २०), रोहित बाळासाहेब केंगार (वय १८), सोहम शहाजी पाटील ( वय २०), ज्ञानेश्वर पाटील (वय २०,रा. चौघेही दत्तनगर,बामणोली) यांचा समावेश आहे. यापैकी स्थानिक गुन्हे अन्वेषणकडून ओंकार जावीर आणि सोहम पाटील याला अटक केली आहे. तर कुपवाड पोलीसांनी रोहित केंगार याला अटक केली आहे. ज्ञानेश्वर पाटील फरार आहे. या घटनेची मयत ओम देसाई याचा भाऊ आदेश देसाई यांनी  कुपवाड पोलीसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत ओम देसाई हा  कुपवाड एमआयडीसीतील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ओम हा जेवण करून कुटुंबीयांसोबत बसला होता. 

       यावेळी दहा वाजण्याच्या सुमारास संशयित ओंकार जावीर यांने मयत ओम यास दत्तनगर येथील खुल्या जागेत फोन करून बोलावून घेतले.  त्यानंतर ओंकार यानें देसाई याला तू माझ्या बहिणीच्या मागे का लागला आहेस असा जाब विचारला.  यावेळी दोघात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी जावीर आणि त्याचे मित्र सोहम पाटील,  ज्ञानेश्वर पाटील व रोहित केंगार याने चाकू व कोयत्याने ओमच्या पोटात व डोक्यावर सपासप वार केले. या खूनी हल्ल्यानंतर  तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला होता. यावेळी आरडाओरडा पाहून लगतच रहावयास असलेला त्याचा भाऊ घटनास्थळी दाखल झाला.

        त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता त्याच्या भावाने ओम याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू डॉक्टरांनी उपचारापूर्वीच ओम याचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस