शिगावनजीक दुचाकी घसरुन तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:24 IST2021-01-17T04:24:11+5:302021-01-17T04:24:11+5:30
शिगाव : आष्टा-वडगाव मार्गावर शिगाव (ता. वाळवा) नजीक रस्त्यावर टाकलेल्या खडीच्या ढिगाऱ्यावरून दुचाकी घसरून झालेल्या अपघातात सोयम मलिकजन बेपारी ...

शिगावनजीक दुचाकी घसरुन तरुण ठार
शिगाव : आष्टा-वडगाव मार्गावर शिगाव (ता. वाळवा) नजीक रस्त्यावर टाकलेल्या खडीच्या ढिगाऱ्यावरून दुचाकी घसरून झालेल्या अपघातात सोयम मलिकजन बेपारी (वय १८, रा. बागणी) हा ठार झाला. हा अपघात शनिवारी रात्री दहाच्या दरम्यान घडला.
आष्टा-वडगाव मार्गावर शिगावनजीक रस्त्याचे काम सुरू आहे. बागणीतील सोयम बेपारी व त्यांचा मित्र योहान देवकुळे दोघे दुचाकीवरुन (क्र. एम. एच. ०९. ई. ई. ८१४१) वडगावकडे जात होते. शिगाव नजीक रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावर खडी टाकली आहे. रात्रीच्या वेळी खडी न दिसल्याने दुचाकी घसरुन पडली. यात सोयम बेपारी हा डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच ठार झाला; तर त्याचा मित्र योहान देवकुळे हा किरकोळ जखमी झाला. या अपघाताची आष्टा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
चौकट
आष्टा-वडगाव रस्त्याचे काम सुरू आहे; मात्र या रस्त्यावर खडी टाकल्यानंतर रिफ्लेक्टर लावलेले नाहीत. रस्त्याचे काम संथगतीने होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी वाहनधारकांतून मागणी होत आहे.
फोटो-१६शिगाव१ व २