करगणीत दुचाकी-डंपरच्या धडकेत तरुण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:31 IST2021-09-04T04:31:38+5:302021-09-04T04:31:38+5:30
आटपाडी : करगणी (ता. आटपाडी) येथे करगणी ते बनपुरी रस्त्यावर पाटील मळ्यानजीक पुलावर डंपर व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. ...

करगणीत दुचाकी-डंपरच्या धडकेत तरुण जखमी
आटपाडी : करगणी (ता. आटपाडी) येथे करगणी ते बनपुरी रस्त्यावर पाटील मळ्यानजीक पुलावर डंपर व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वार कैलास तुकाराम सरगर (वय ३५, रा. करणगी) हा गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्यासुमारास घडली. याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
करगणीतील पाटील मळा येथे राहणारा कैलास सरगर हा सकाळी करगणी-बनपुरी मार्गावरून दुचाकी आपल्या घरी येत होता. यावेळी पाटील मळ्यानजीक त्याच्या दुचाकीला बनपुरीच्या दिशेने करगणीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरची (क्र. एमएच १० सी. आर. ९०९७) समोरुन धडक बसली. यामध्ये कैलास गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती समजताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी कैलासला सांगलीतील शासकीय रुग्णालात दाखल करण्यात आले, तर अपघातातील डंपर व चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
चाैकट
या मार्गावरून नेहमी अतिअवजड डंपरची वाहतूक होत असते. याचा स्थानिक नागरिकांना त्रास होत आहे. शुक्रवारी अपघातानंतर नागरिकांनी रस्त्यावर ठाण मांडून संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन डंपर ताब्यात घेतला व पुढील कार्यवाहीचे नागरिकांना आश्वासन दिले.