नांद्रेजवळ जेसीबीच्या धडकेत तरूण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:20 IST2021-05-28T04:20:02+5:302021-05-28T04:20:02+5:30

सांगली : नांद्रे कर्नाळ रोडवर जेसीबीचे बकेट लागून तरूण जखमी झाला. वैभव शंकरराव शिंदे (रा. नावरसवाडी, ता. मिरज) असे ...

Young man injured in JCB collision near Nandra | नांद्रेजवळ जेसीबीच्या धडकेत तरूण जखमी

नांद्रेजवळ जेसीबीच्या धडकेत तरूण जखमी

सांगली : नांद्रे कर्नाळ रोडवर जेसीबीचे बकेट लागून तरूण जखमी झाला. वैभव शंकरराव शिंदे (रा. नावरसवाडी, ता. मिरज) असे जखमीचे नाव असून, त्याने जेसीबी चालक संजय खंडू साळुंखे (रा. नांद्रे) याच्याविरोधात सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.

शुक्रवार, दि. २१ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास नांद्रे-कर्नाळ रोडवर कंपाऊंडचे काम सुरु होते. फिर्यादी वैभव आईला सोडून परत नावरसवाडीला जात होता. यावेळी जेसीबी चालकाने बकेट रस्त्यावर ठेवले होते. ते बकेट वैभवच्या पायाला लागले व त्याचा एक दात घुसून तो जखमी झाला. यात त्याच्या दुचाकीचेही नुकसान झाले. जेसीबी चालकाच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार सांगली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Young man injured in JCB collision near Nandra