मारहाणीत तरुण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:29 IST2021-01-08T05:29:15+5:302021-01-08T05:29:15+5:30

------------------------------- दुचाकी अपघातात एक जखमी सांगली : कळंबी रोडवर दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातात एकजण जखमी झाला. विठ्ठल पिराज जाधव ...

Young man injured in beating | मारहाणीत तरुण जखमी

मारहाणीत तरुण जखमी

-------------------------------

दुचाकी अपघातात एक जखमी

सांगली : कळंबी रोडवर दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातात एकजण जखमी झाला. विठ्ठल पिराज जाधव (वय ४९, रा. मालगाव) असे जखमीचे नाव असून, बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात घडला. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

------------------------------

कुपवाडला एकास मारहाण

सांगली : कुपवाड येथील तरुणास मारहाण झाली. सदानंद रावजी डफळे (वय ३५) असे त्याचे नाव असून, जखमी अवस्थेत त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

----------------------------

ढालगावच्या एकास सर्पदंश

सांगली : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील युवकास सर्पदंश झाला. वैभव मोहन देसाई (वय १७) असे त्याचे नाव असून, बुधवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Young man injured in beating