मुचंडीत दुचाकीवरून पडून तरुण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:23 IST2021-04-05T04:23:52+5:302021-04-05T04:23:52+5:30
सांगली : मुचंडी (ता. जत) येथे दुचाकीवरून पडून तरुण जखमी झाला. महेश भीमाण्णा मंगसुळी (वय २८) असे त्याचे ...

मुचंडीत दुचाकीवरून पडून तरुण जखमी
सांगली : मुचंडी (ता. जत) येथे दुचाकीवरून पडून तरुण जखमी झाला. महेश भीमाण्णा मंगसुळी (वय २८) असे त्याचे नाव असून, शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
---
बेडगचा एकजण अपघातात जखमी
सांगली : मिरज रोडवर दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातात एक जखमी झाला. खंडेराव तुकाराम कांबळे (वय ४५, रा. बेडग) असे जखमीचे नाव असून, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
---
कुपवाडला तरुणास मारहाण
सांगली : कुपवाड येथे तरुणास बाटलीने मारहाण करण्यात आली. यात गोलू लेवकराम यादव (वय २१) हा जखमी झाला असून, शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
---
सांगलीत अपघातात वृद्ध जखमी
सांगली : शहरातील कत्तलखाना परिसरात दुचाकी आणि सायकलमध्ये झालेल्या अपघातात वृध्द जखमी झाले. नरसगोंडा पाटील (वय ६५, रा. अरिहंत कॉलनी) असे जखमीचे नाव असून, शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.