गणपती विसर्जनावेळी कडेगाव तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:29 IST2021-09-21T04:29:49+5:302021-09-21T04:29:49+5:30
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार: रविवारी दुपारच्या सुमारास विशाल हा कडेगाव येथील तलावात गणपती विसर्जन करण्यासाठी गेला होता. या वेळी ...

गणपती विसर्जनावेळी कडेगाव तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार: रविवारी दुपारच्या सुमारास विशाल हा कडेगाव येथील तलावात गणपती विसर्जन करण्यासाठी गेला होता. या वेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. नागरिकांनी व नातेवाईकांनी विशालला बाहेर काढले. त्याला तत्काळ कडेपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. कडेगाव तलावात गणेशविसर्जनावेळी विशेषतः अनंत चतुर्थीदिवशी मोठी गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त ठेवून नगरपंचायतद्वारे तिथे अतिरिक्त मनुष्यबळ देऊन मूर्ती संकलन आणि विसर्जनाची शिस्तबद्ध व्यवस्था केलेली नव्हती. नागरिक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना थेट पाण्यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्यास प्रतिबंध घातला असता, तर ही दुर्दैवी घटना टाळता आली असती अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. या घटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे.