सांगलीत अपघातात तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:25 IST2020-12-29T04:25:46+5:302020-12-29T04:25:46+5:30

सांगली : कोल्हापूर रोडवर दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. सोहेल शहाजहान बागवान (वय २६, रा. गवळी गल्ली, ...

Young man dies in Sangli accident | सांगलीत अपघातात तरुणाचा मृत्यू

सांगलीत अपघातात तरुणाचा मृत्यू

सांगली : कोल्हापूर रोडवर दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. सोहेल शहाजहान बागवान (वय २६, रा. गवळी गल्ली, सांगली) असे त्याचे नाव असून, शनिवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास ही घटना घडली. दोनच महिन्यांपूर्वी सोहेलचा विवाह झाला होता.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फळविक्रेता म्हणून सोहेल काम करत होता. दोनच महिन्यांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. शनिवारी रात्रीच्या सुमारास तो दुचाकी (एमएच १० एजे ७७८६) कोल्हापूर रोडवरून घेऊन येत असताना त्याचा अपघात झाला. यात डोक्याला मार लागल्याने तो जखमी झाला होता. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांत या घटनेची नोंद आहे.

-----------------------------

२७ सोहेल बागवान एडिटोरियल

Web Title: Young man dies in Sangli accident