वड्डीत विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:36 IST2021-06-16T04:36:21+5:302021-06-16T04:36:21+5:30
मिरज : वड्डी (ता. मिरज) येथून चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या प्रकाश ऊर्फ दादासाहेब वसंत शिरतोडे (वय २८) या तरुणाचा ...

वड्डीत विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू
मिरज : वड्डी (ता. मिरज) येथून चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या प्रकाश ऊर्फ दादासाहेब वसंत शिरतोडे (वय २८) या तरुणाचा सोमवारी गावातीलच एका विहिरीत मृतदेह सापडला. दारूच्या नशेत तो विहिरीत पडला असल्याचा संशय आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद आहे.
वड्डी येथील शांतिनगर परिसरात राहणाऱ्या प्रकाश ऊर्फ दादासाहेब शिरतोडे यास दारूचे व्यसन होते. व्यसनाच्या आहारी गेल्याने गेल्या काही दिवसांपासून त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. चार दिवसांपूर्वी तो घरातून बाहेर पडला, ताे परत घरी आलाच नाही. शाेध घेऊनही न सापडल्याने पत्नीने मिरज ग्रामीण पोलिसात ताे बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. पोलिसांकडूनही प्रकाशचा शोध सुरू होता. सोमवारी दुपारी गावातील विहिरीत एक मृतदेह तरंगत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. विहिरीभोवती बघ्यांची मोठी गर्दी झाली. पोलिसांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यानंतर मृत व्यक्ती प्रकाश शिरतोडे असल्याचे निष्पन्न झाले. दारूच्या नशेत प्रकाश विहिरीत पडल्याचा संशय आहे.