कुंभारीत विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:24 IST2021-02-15T04:24:31+5:302021-02-15T04:24:31+5:30

जत : कुंभारी (ता. जत) येथील तानाजी सुधाकर भोर (वय ३५) या तरुणाचा मासेमारी करत असताना विजेच्या धक्का बसून ...

A young man dies after being struck by lightning | कुंभारीत विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

कुंभारीत विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

जत : कुंभारी (ता. जत) येथील तानाजी सुधाकर भोर (वय ३५) या तरुणाचा मासेमारी करत असताना विजेच्या धक्का बसून जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी दोन वाजता मोडक बंधाऱ्यात घडली. याप्रकरणी नाथा पाटील यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे.

कुंभारी ते डफळापूर रस्त्यावर कुंभारीपासून तीन किलोमीटर अंतरावर मोडक बंधारा आहे. येथे तानाजी भोर सहकाऱ्यासोबत मासेमारीसाठी गेले होते. वीजप्रवाह पाण्यात सोडून मासेमारी करत असताना वीजवाहक तार अचानक शॉर्ट हाेऊन त्यास भाेर यांचा स्पर्श झाला. विजेचा जाेरदार धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर भोर यांच्यासोबत आलेले दोन-तीन सहकारी भीतीने तेथून पळाले. काही वेळाने परिसरातील ग्रामस्थांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी जत पाेलिसांना माहिती दिली. मृत तानाजी याच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.

फोटो : १४ तानाजी भाेर

Web Title: A young man dies after being struck by lightning