शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम फोडणाऱ्या तरुणाला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 14:58 IST

शंभरफुटी रस्त्यावरील बँक आॅफ महाराष्ट्रचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाºया चोरट्याला विश्रामबाग पोलिसांनी रविवारी पहाटे रंगेहात पकडले. ओंकार रामचंद्र कदी (वय २२, रा. हरभट रोड, सांगली) असे संशयिताचे नाव आहे. एटीएम फोडून पैसे चोरण्याचा त्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला.

ठळक मुद्देएटीएम फोडणाऱ्या तरुणाला पकडलेपोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रयत्न फसला

सांगली : शंभरफुटी रस्त्यावरील बँक आॅफ महाराष्ट्रचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला विश्रामबाग पोलिसांनी रविवारी पहाटे रंगेहात पकडले. ओंकार रामचंद्र कदी (वय २२, रा. हरभट रोड, सांगली) असे संशयिताचे नाव आहे. एटीएम फोडून पैसे चोरण्याचा त्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी घरफोडी, चोरी, चेन स्नॅचिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी नाकाबंदी, पेट्रोलिंग करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विश्रामबागचे निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक शनिवारी रात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग करीत होते.

यावेळी ठाणे अंमलदार विलास मुंढे यांना शंभरफुटी रस्त्यावरील आनंदश्री अपार्टमेंटमधील बँक आॅफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सहायक फौजदार कोष्टी, विलास मुंढे, सुदर्शन पाटील, सचिन फडतरे, बबलू तांबट, ऋतुराज होळकर हे तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले.यावेळी एटीएममध्ये ओंकार कदी हा तोंडाला रुमाल बांधून काही तरी करीत असताना आढळला. पथकाने त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्याच्याकडे कटावणी व स्क्रू ड्रायव्हर मिळून आला. त्याने एटीएमचा लहान दरवाजा उघडला होता. त्याच्याकडे चौकशी केली असता, दुचाकीवरून पैसे चोरण्यासाठी आल्याची कबुली त्याने दिली.त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेची माहिती बँक आॅफ महाराष्ट्रचे अधिकारी व सुरक्षा एजन्सीना देण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली