सांगलीवाडीत कौटुंबिक कारणातून तरुणास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:30 IST2021-09-12T04:30:28+5:302021-09-12T04:30:28+5:30
सांगली : शहरातील सांगलीवाडी येथील साईनगर परिसरात कौटुंबिक कारणातून तरुणास धमकी देत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी उमेश परमानंद लोहार ...

सांगलीवाडीत कौटुंबिक कारणातून तरुणास मारहाण
सांगली : शहरातील सांगलीवाडी येथील साईनगर परिसरात कौटुंबिक कारणातून तरुणास धमकी देत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी उमेश परमानंद लोहार (रा. साईनगर पहिली गल्ली) यांने शिवाजी पाटील, राहुल माने, बबलू, कल्लाप्पा, शिवानंद सुतार आणि पत्नी पार्वती उमेश लोहार यांच्याविरोधात शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी उमेश व त्यांच्या पत्नीमधील घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात आहे. गुरुवार, दि. ९ रोजी संशयित पत्नी पार्वतीला घेऊन आले व त्यांनी जबरदस्तीने नांदविण्याच्या उद्देशाने वाद सुरू केला. यातून उमेशच्या घरात संशयितांनी मारहाण केली व पत्नीला नांदव नाहीतर तुला बघून घेतो म्हणून धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संशयिताविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.