सांगलीत रागाने बघितल्याने तरुणास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:23 IST2021-04-12T04:23:41+5:302021-04-12T04:23:41+5:30

सांगली : शहरातील गारपीर चौकात, ‘आमच्याकडे रागाने का बघतोस’ असे म्हणून चौघाजणांनी तरुणास कोयत्याने मारून जखमी केले. याप्रकरणी ऋषिकेश ...

Young man beaten for looking angry in Sangli | सांगलीत रागाने बघितल्याने तरुणास मारहाण

सांगलीत रागाने बघितल्याने तरुणास मारहाण

सांगली : शहरातील गारपीर चौकात, ‘आमच्याकडे रागाने का बघतोस’ असे म्हणून चौघाजणांनी तरुणास कोयत्याने मारून जखमी केले. याप्रकरणी ऋषिकेश दुर्गादास कांबळे (वय २१, रा. विठ्ठलनगर, सांगली) याने रोहित सातपुते, गणेश सातपुते, फऱ्या आणि जाफऱ्या (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. रमामातानगर, सांगली) यांच्याविरोधात शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास शहरातील भीमज्योत चौकात फिर्यादी ऋषिकेश हा त्याच्याकडील कामगार अमिन यास पैसे देण्यासाठी गेला होता. यावेळी त्याच्या ओळखीच्या असलेल्या संशयितांनी ‘तू आमच्याकडे रागाने का

बघतोस, तू इकडे यायचे नाहीस’ म्हणत मोटारसायकलवरून खाली पाडून ऋषिकेशच्या डोक्यात कोयत्याने मारले. दुसऱ्या संशयिताने दगडाने पाठीत मारत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Young man beaten for looking angry in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.