मिरजेत गांजा विकणाऱ्या तरुणास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:26 IST2021-04-13T04:26:04+5:302021-04-13T04:26:04+5:30

सांगली : मिरजेतील रेल्वे स्थानक परिसरात गांजाची विक्री करणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेेषण शाखेच्या पथकाने अटक केली. गणेश खन्ना ...

Young man arrested for selling cannabis in Miraj | मिरजेत गांजा विकणाऱ्या तरुणास अटक

मिरजेत गांजा विकणाऱ्या तरुणास अटक

सांगली : मिरजेतील रेल्वे स्थानक परिसरात गांजाची विक्री करणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेेषण शाखेच्या पथकाने अटक केली. गणेश खन्ना नायडू (वय २८, रा. ख्वाजा बस्ती, मिरज) असे संशयिताचे नाव असून त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

अवैैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक मिरज रेल्वेस्थानक परिसरात गस्तीवर असताना, पथकातील पोलिसांना माहिती मिळाली की, रेल्वे स्टेशनसमोरील पे पार्किंगजवळ असलेल्या बंद खोक्याच्या आडोशाला बसून संशयित गणेश गांजाची विक्री करत आहे. त्यानुसार पथकाने छापा टाकल्यानंतर गणेशजवळ पाच किलो गांजा मिळून आला. त्याच्यावर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित सावंत, सुधीर गोरे, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर, राहुल जाधव यांनी कारवाई केली.

Web Title: Young man arrested for selling cannabis in Miraj