बुधगावमध्ये विजेच्या धक्क्याने तरुण ठार

By Admin | Updated: June 7, 2014 00:20 IST2014-06-07T00:20:14+5:302014-06-07T00:20:34+5:30

विपुल तानाजी आवळे

Young killed by electric shocks in Budhgaon | बुधगावमध्ये विजेच्या धक्क्याने तरुण ठार

बुधगावमध्ये विजेच्या धक्क्याने तरुण ठार

सांगली : विजेचा धक्का जोरात बसल्याने बुधगाव (ता. मिरज) येथील तरुण ठार झाला. विपुल तानाजी आवळे (वय २१) असे या तरुणाचे नाव आहे. आज (शुक्रवार) सकाळी ही घटना घडली. घटनेची सांगली ग्रामीण पोलिसांत नोंद आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विपुलच्या घरात लोखंडी अँगलला सिलिंग फॅन बसविण्यात आला आहे. हाच अँगल घरातील बाथरुममध्ये आहे. सिलिंग फॅनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्यातील वीजप्रवाह अँगलमध्ये उतरला होता. हा प्रकार घरात कोणालाही माहिती नव्हता. विपुल बाथरुममध्ये अंघोळीसाठी गेला होता. अंघोळ केल्यानंतर अंग पुसण्यासाठी त्याने अँगलवर ठेवलेला टॉवेल घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा हात अँगलला लागला. यामुळे त्याला विजेचा जोरात धक्का बसला. तो मोठ्याने ओरडतच उडून पडला. घरातील लोक धावत आले. त्याला मृतावस्थेत सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Young killed by electric shocks in Budhgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.