शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

मोटार झाडावर आदळून विट्याचा तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:13 AM

विटा : गोवा येथून विट्याकडे येणाऱ्या अल्टो मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव मोटार रस्त्याच्या बाजूला झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात जयेंद्र रवींद्र लिमये (वय २८, रा. विवेकानंदनगर, विटा) हा तरुण जागीच ठार झाला. या अपघातात चारजण जखमी झाले आहेत.चालक विद्याधर प्रताप कुलकर्णी (३०), विश्वास रत्नाकर जोग (४४, दोघेही रा. विटा), ...

विटा : गोवा येथून विट्याकडे येणाऱ्या अल्टो मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव मोटार रस्त्याच्या बाजूला झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात जयेंद्र रवींद्र लिमये (वय २८, रा. विवेकानंदनगर, विटा) हा तरुण जागीच ठार झाला. या अपघातात चारजण जखमी झाले आहेत.चालक विद्याधर प्रताप कुलकर्णी (३०), विश्वास रत्नाकर जोग (४४, दोघेही रा. विटा), महेश मुकुंद इनामदार (२७, रा. रेणावी, ता. खानापूर) व तेजस दत्तात्रय कुलकर्णी (३०, रा. सांगली) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. हा अपघात मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता निपाणी येथे झाला.येथील जयेंद्र लिमये, विद्याधर कुलकर्णी, विश्वास जोग, महेश इनामदार व तेजस कुलकर्णी गणेशोत्सवातील पूजा-अर्चा करण्यासाठी अल्टो मोटारीने गणेश चतुर्थीच्या पहिल्यादिवशी बुधवार, दि. १२ रोजी गोवा येथे गेले होते. सोमवारी पाचव्यादिवशी गणेश विसर्जन झाल्यानंतर रात्री हे पाचजण गोव्याहून विट्याकडे येण्यासाठी निघाले होते.बुधवारी पहाटे निपाणी शहराजवळ त्यांची मोटार आली असता, चालक विद्याधर कुलकर्णी यांचा मोटारीवरील ताबा सुटल्याने भरधाव मोटार राष्टÑीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, जयेंद्र लिमये जागीच ठार झाला; तर मोटारीतील अन्य चौघेजण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तातडीने कोल्हापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले.मृत जयेंद्र लिमये येथील डॉ. रवींद्र लिमये यांचा एकुलता एक मुलगा होता. अपघाताचे वृत्त समजताच विट्यातून नातेवाईक घटनास्थळी रवाना झाले. बुधवारी सायंकाळी सर्व जखमींना विटा येथे आणण्यात आले; तर रात्री उशिरा मृत जयेंद्रवर अंत्यसंस्कार करण्यात आले.