झाडावरून पडून तरुण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:51 IST2021-03-04T04:51:26+5:302021-03-04T04:51:26+5:30
सांगली : मिरज तालुक्यातील शिपूर येथे झाडावरून पडून तरुण जखमी झाला. महेंद्र भाऊसाहेब कांबळे (वय २७) बुधवारी दुपारी एकच्या ...

झाडावरून पडून तरुण जखमी
सांगली : मिरज तालुक्यातील शिपूर येथे झाडावरून पडून तरुण जखमी झाला. महेंद्र भाऊसाहेब कांबळे (वय २७) बुधवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
---
शेड्याळमध्ये एकास मारहाण
सांगली : शेड्याळ येथे एकास मारहाण झाली. त्यात कल्लव्वा शेकाप्पा तेली (वय ५५्) जखमी झाले. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
--
बनपुरीच्या तरूणास मारहाण
सांगली : बनपुरी (ता. आटपाडी) येथील तरूणास गोटखिंडी येथे मारहाण करण्यात आली. यात संतोष धर्मा बनसोडे (वय ३०) असे जखमी तरूणाचे नाव आहे. त्यास उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
--
मणेराजुरी येथे एकास मारहाण
सांगली : मणेराजुरी (ता. तासगाव) येथील एकास काठीने मारहाण करण्यात आली. धनाजी बाबूराव चव्हाण (वय ५०) असे जखमीचे नाव असून मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यांना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
--
मिरजेत एकास मारहाण
सांगली : शहरातील स्टेशन रोडवर तरूणास मारहाण करण्यात आली. यात तुकाराम नंदुराम आलमने (वय २९) हा जखमी झाला. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
--
अपघातात तरुण जखमी
सांगली : इचलकरंजी येथील तरुण अपघातात जखमी झाला. रोहित दिलीप चव्हाण (वय १८) असे जखमीचे नाव असून बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला. त्यास उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले.
--