शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

युवा पिढीने मायबोली मराठीचे संवर्धन करावे : सुवर्णा पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 18:38 IST

जागतिकीकरण व स्पर्धेच्या युगात युवा वर्ग आपल्या मायबोली मराठी साहित्यापासून काहीसा दुरावलेला दिसून येत आहे. साहित्य वाचन मागे पडले आहे. त्यामुळे लिखाणही मागे पडले आहे. वाचन, विचार, चिंतन साहित्यातून येते. आपल्या मायबोलीचे संवर्धन करण्यासाठी युवा पिढीने वाचन, लेखन करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि साहित्यिका सुवर्णा पवार यांनी केले.

ठळक मुद्देयुवा पिढीने मायबोली मराठीचे संवर्धन करावे : सुवर्णा पवारमराठी भाषा गौरव दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय येथे कार्यक्रम

सांगली : जागतिकीकरण व स्पर्धेच्या युगात युवा वर्ग आपल्या मायबोली मराठी साहित्यापासून काहीसा दुरावलेला दिसून येत आहे. साहित्य वाचन मागे पडले आहे. त्यामुळे लिखाणही मागे पडले आहे. वाचन, विचार, चिंतन साहित्यातून येते. आपल्या मायबोलीचे संवर्धन करण्यासाठी युवा पिढीने वाचन, लेखन करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि साहित्यिका सुवर्णा पवार यांनी केले.मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय सांगली येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त एस. के. माळी, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांच्यासह शासकीय कार्यालयाचे कर्मचारी, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी उपस्थित होते.श्रीमती सुर्वणा पवार म्हणाल्या, लेखण करण्यासाठी वाचनाची सवय लागली पाहिजे. वाचाल तर वाचाल या म्हणीप्रमाणे मायबोलीचे संवर्धन करण्यासाठी वाचन, लेखण अत्यंत आवश्यक आहे. सामाजिक मुल्यांची जपणूक करायची असेल तर वाचन, लेखण केले पाहिजे. प्रत्येकामध्ये एक सुप्त साहित्यिक असतो. तो व्यक्त झाला पाहिजे. जर माणूस व्यक्त होत गेला तर वाचकही वाढतील, असेही त्या म्हणाल्या.सहाय्यक आयुक्त एस. के. माळी म्हणाले, मराठी भाषा ही मुळातच सुसंस्कृत व विकसीत असून तिला फक्त प्रफुल्लीत व जिवंत ठेवण्याचे काम करावयाचे आहे. मराठी भाषेमध्ये सौंदर्य आहे ते टिकविण्यासाठी भाषेची चांगली जपणूक करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागामध्ये जी भाषा बोलली जाते त्यामध्येही सौंदर्य आहे. त्यासाठी ग्रामीण भाषेचीही जपणूक करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मराठी भाषा संवर्धनाचे जनक कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी कार्यक्रमाचा हेतू विशद करून मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे सांगून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. आभार सर्वसाधारण सहाय्यक शंकरराव पवार यांनी मानले. 

 

टॅग्स :Marathi Bhasha Dinमराठी भाषा दिनSangliसांगली