बागणीचा तरुण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:28 IST2021-02-16T04:28:40+5:302021-02-16T04:28:40+5:30
सांगली : बागणी (ता. वाळवा) येथील सुरेश दादू चव्हाण (वय २४) हा तरुण ट्रॅक्टरवरून पडून जखमी झाला. रविवारी सकाळी ...

बागणीचा तरुण जखमी
सांगली : बागणी (ता. वाळवा) येथील सुरेश दादू चव्हाण (वय २४) हा तरुण ट्रॅक्टरवरून पडून जखमी झाला. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
-------------------
वृद्धेस अज्ञात प्राण्याचा दंश
सांगली : कवलापूर (ता.मिरज) येतील वत्सला बाबूराव मुळे (वय ६५) यांना अज्ञात प्राण्याचा दंश झाला. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास शेतात हा प्रकार घडला. नातेवाइकांनी त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
-------------------
दुचाकीवरून पडून वृद्ध जखमी
सांगली : शहरातील रामनगर येथील श्यामराव सदाशिव पवार (वय ६५) हे दुचाकीवरून पडून जखमी झाले. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास आमराईसमोर ही घटना घडली. त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
----------------
अपघातात तरुण जखमी
सांगली : कवठेमहांकाळजवळ झालेल्या अपघातात तरुण जखमी झाला. दीपक रामचंद्र वावरे (वय ३०, रा. कोंगनोळी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.