शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली आयटीआयचा योगेश पवार राज्यात प्रथम, विजय मराठे द्वितीय

By संतोष भिसे | Updated: September 16, 2022 14:06 IST

जिल्ह्यातील सर्व म्हणजे १० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत शनिवारी दीक्षांत सोहळा होत आहे.

सांगली : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या योगेश पवार या विद्यार्थ्याने वायरमन शिक्षणक्रमाच्या अंतिम परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याने ६०० पैकी ५७४ गुण मिळविले. मशिनिस्ट ग्रायंडर शिक्षणक्रमाचा विद्यार्थी विजय मराठे याने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला.अंतिम परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यशस्वी विद्यार्थ्यांचा दीक्षांत सोहळा शनिवारी सकाळी ११ वाजता संस्थेत होणार आहे. यावेळी सर्व यशस्वी प्रशिक्षणार्थींचा सत्कार आमदार सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते केला जाईल. कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्याना गौरविण्यात येईल. प्रत्येक शिक्षणक्रमात पहिले तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार होईल.विद्यार्थ्याचा दीक्षांत समारंभ आयोजित करण्याचा निर्णय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे, त्यानुसार सांगलीतही कार्यक्रम होत आहे.   जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तथा प्राचार्य यतिन पारगांवकर यांनी ही माहिती दिली. कार्यक्रमाला प्रथितयश उद्योजक उपस्थित राहणार असून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. याशिवाय रक्तदान शिबीरही आयोजित केले आहे. संयोजन उपप्राचार्य व्ही. बी. देशपांडे, सदाशिवराव पाटील, गटनिदेशक शिवाजी  गोसावी आदींनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व म्हणजे १० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत शनिवारी दीक्षांत सोहळा होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीStudentविद्यार्थीiti collegeआयटीआय कॉलेज