योगेश कुलकर्णी यांची उपाध्यक्षपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:22 IST2021-01-14T04:22:32+5:302021-01-14T04:22:32+5:30

कोकरुड : आरळा (ता. शिराळा) येथील योगेश कुलकर्णी यांची सांगली जिल्हा (ग्रामीण) भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी फेरनिवड ...

Yogesh Kulkarni elected as Vice President | योगेश कुलकर्णी यांची उपाध्यक्षपदी निवड

योगेश कुलकर्णी यांची उपाध्यक्षपदी निवड

कोकरुड : आरळा (ता. शिराळा) येथील योगेश कुलकर्णी यांची सांगली जिल्हा (ग्रामीण) भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.

योगेश कुलकर्णी हे भाजप नेते सत्यजित देशमुख यांचे समर्थक त्याचबरोबर माजी सभापती हणमंतराव पाटील (बापू) त्यांचे सहकारी आहेत. यापूर्वी योगेश कुलकर्णी यांना संघटनेच्या विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली होती. त्यांच्या कामाची पोहोचपावती म्हणून सत्यजित देशमुख व माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी काम करण्याची संधी दिली आहे. नुकतीच पलूस येथे त्यांची निवड झाली.

यावेळी सांगली जिल्ह्याचे नूतन प्रभारी प्रदेश सचिव गणेश वरपे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य खाडे, युवा मोर्चा सांगली जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, संघटन सरचिटणीस सुंदर पाटील, शिराळा नगरसेवक केदार नलवडे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सागर नाईक, रूपेश चव्हाण, सरपंच विनोद पन्हाळकर, धनाजी सावंत आदी उपस्थित होते.

फाेटाे : १३ याेगेश कुलकर्णी

Web Title: Yogesh Kulkarni elected as Vice President