‘खेलो इंडिया’साठी योगासन क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:31 IST2021-09-17T04:31:16+5:302021-09-17T04:31:16+5:30

सांगली : ‘खेलो इंडिया’ निवड प्रक्रियेसाठी योगासन स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील संघाची ...

Yogasana sports competition program announced for 'Khelo India' | ‘खेलो इंडिया’साठी योगासन क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर

‘खेलो इंडिया’साठी योगासन क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर

सांगली : ‘खेलो इंडिया’ निवड प्रक्रियेसाठी योगासन स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील संघाची निवड स्पर्धेतून केली जाणार आहे.

मुला-मुलींच्या तीन स्वतंत्र वयोगटांत ऑनलाईन स्पर्धा होतील. त्यातून प्रत्येक गटातील चौदा खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय पातळीवरील संघात निवड केली जाईल. खेळाडूंनी योगासनांच्या विविध पाच स्पर्धा प्रकारांचे व्हिडिओ पाठवायचे आहेत. सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील स्पर्धा समन्वयकांशी संपर्क साधण्याचे आवाहन महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे सचिव डॉ. संजय मालपाणी यांनी केले आहे.

शासनाने योगासनांना खेळाचा दर्जा दिल्यानंतर, राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशनतर्फे योगपटूंसाठी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. स्पर्धेत ९ ते १४, १४ ते १८ व १८ वर्षांपुढील मुला-मुलींचे स्वतंत्र तीन गट आहेत. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंतचे वय गृहीत धरले जाईल. पारंपरिक योगासन (वैयक्तिक), कलात्मक योगासन (वैयक्तिक व दुहेरी), तालात्मक योगासन (दुहेरी) व सांघिक कलात्मक (पाच खेळाडू) अशा पाच प्रकारांत स्पर्धा होईल. प्रत्येक गटातील प्रत्येकी चौदा खेळाडूंची जिल्हास्तरावरून राज्य पातळीवर व राज्य पातळीवरून राष्ट्रीय पातळीवर निवड होईल. नावनोंदणी १८ सप्टेंबरपर्यंत करता येईल. अधिकाधिक खेळाडूंनी सहभागी होण्याचे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष बापू पडळकर व स्पर्धा संचालक सतीश मोहगावकर यांनी केले आहे.

चौकट

यांच्याशी संपर्क साधा

सांगली जिल्ह्यातील योगासन खेळाडूंनी स्पर्धेत सहभागासाठी शकुंतला खोत, शैलेश कदम, मोहन कवठेकर, अर्चना कवठेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Web Title: Yogasana sports competition program announced for 'Khelo India'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.