निरोगी आयुष्यासाठी योग हीच गुरुकिल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST2021-06-22T04:19:27+5:302021-06-22T04:19:27+5:30
इस्लामपूर : निरोगी आणि निरामय आयुष्य जगण्यासाठी नियमित योगा करणे हाच उत्तम पर्याय आहे. योग हीच निरामय आयुष्याची ...

निरोगी आयुष्यासाठी योग हीच गुरुकिल्ली
इस्लामपूर : निरोगी आणि निरामय आयुष्य जगण्यासाठी नियमित योगा करणे हाच उत्तम पर्याय आहे. योग हीच निरामय आयुष्याची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन योगपंडित सर्जेराव टकले यांनी केले. टकले यांनी विविध आसनांचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले.
पेठनाका येथील व्यंकटेश्वरा शिक्षणसंस्थेच्या नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम झाला. संस्थेचे सचिव राहुल महाडिक, कार्यकारी संचालक प्रा. महेश जोशी, प्राचार्य डॉ. ए.ए. मिरजे, प्रा. राहुल चिटणीस यांनी योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रा. सत्यजित घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. ए.के. पाटील यांनी आभार मानले. प्रा. संदीप पाटील यांनी संयोजन केले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.