शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

येरळेच्या पुरामुळे वसगडे बंधारा झाला ओव्हर फ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 19:27 IST

dam, sangli ,rain, railway दोन दिवस झालेल्या परतीच्या संतत धार व मुसळधार पावसामुळे पलूस व मिरज तालुक्याच्या सिमेवर असणारा वसगडे येथील बंधारा ओव्हर फ्लो झाला आहे.ब्रिटिश कालीन रेल्वे पूलाला होणारा संभाव्य धोक्याची शक्यता ओळखून रेल्वे प्रशासनाने गुरुवारी मध्यरात्री पासून वाहतूक बंद ठेवली आहे.

ठळक मुद्देयेरळेच्या पुरामुळे वसगडे बंधारा झाला ओव्हर फ्लोसंभाव्य धोक्यामुळे रेल्वे वाहतूक बंद

भिलवडी- दोन दिवस झालेल्या परतीच्या संतत धार व मुसळधार पावसामुळे पलूस व मिरज तालुक्याच्या सिमेवर असणारा वसगडे येथील बंधारा ओव्हर फ्लो झाला आहे.ब्रिटिश कालीन रेल्वे पूलाला होणारा संभाव्य धोक्याची शक्यता ओळखून रेल्वे प्रशासनाने गुरुवारी मध्यरात्री पासून वाहतूक बंद ठेवली आहे.पुणे - मिरज रेल्वे मार्ग द्वारे संपूर्ण उत्तर भारत आणि मिरज ते हुबळी, हैदराबाद मार्गाने दक्षिण भारतातीला मिरज जंक्शन ला जोडणारा रेल्वेमार्गावर नांद्रे आणि वसगडे गावाच्या दरम्यान ब्रिटिश कालीन रेल्वे पूल आहे. पावसामुळे या भागातील सर्व ओढे,नाले भरून वाहू लागले असून येरळा नदीला ही मोठ्या प्रमाणात पूर आला आहे.

पाटबंधारे विभागाने वसगडे येथे असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बांधाऱ्या वरील बर्गे काढून पाण्याला मार्ग दिला नाही. परिणामी बंधारा ओव्हर फलो झाला आणि वाट मिळेल तिकडे पाणी पसरू लागले आहे. येरळा नदी काठावर असणाऱ्या शेतीचे पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

रेल्वे पुलाच्या बाजूला असणारा मातीचा भराव वाहून गेल्याने रेल्वे पुलाला धोका निर्माण झाला आहे. दिल्ली हून दक्षिणेत जाणाऱ्या सर्व रेल्वे एक्स्प्रेस गाड्या या पुलावरून जात असल्याने धोका नको म्हणून रेल्वेने ही वाहतुक थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

सद्या रेल्वेची सांगली, मिरज,कोल्हापूर येथून दोनशे आसपास अधिकारी कर्मचारी यांची टीम तेथे दाखल झाली असून पुलाच्या सुरक्षिततेचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळाकडे जाण्यासाठी रस्ते उपलब्ध नसल्याने कामात अडचणी होत आहेत. 

टॅग्स :DamधरणSangliसांगली