येळावीत सत्तांतर; राष्ट्रवादीप्रणित आघाडीचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:29 IST2021-01-19T04:29:07+5:302021-01-19T04:29:07+5:30

अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य अमित ऊर्फ विशाल पाटील व भाजपचे पंचायत समिती सदस्य उमेश ...

Yelavit Sattantar; Victory of the Nationalist Front | येळावीत सत्तांतर; राष्ट्रवादीप्रणित आघाडीचा विजय

येळावीत सत्तांतर; राष्ट्रवादीप्रणित आघाडीचा विजय

अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य अमित ऊर्फ विशाल पाटील व भाजपचे पंचायत समिती सदस्य उमेश पाटील यांच्या वर्चस्वाची लढत म्हणून या लढतीकडे संपूर्ण तासगाव तालुक्याचे लक्ष लागले होते. विविध डावपेच व भाऊबंदकीच्या चढाओढीमुळे ही निवडणूक रंगतदार झाली. परंतु राष्ट्रवादी व कॉंग्रेसप्रणित आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले. तासगावचे माजी सभापती विजय पाटील यांनी दिलेली साथ सत्ताधारी बाबासाहेब पाटील गटाला विजयापर्यंत घेऊन गेली. जनजागृती पॅनेल गावाचा विकास जनतेपर्यंत पोहोचविण्यात कमी पडले.

विजयी गटाने गावात आ. बाबासाहेब पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून फटाक्यांची आतषबाजी केली. खासदार संजयकाका पाटील यांचे मेहुणे अमर पाटील अल्प मतांनी विजयी झाले. भाजपप्रणित गटाच्या सरपंच मंगल मंगसुळे व उपसरपंच नीलम जाधव यांना पराभव पत्करावा लागला.

Web Title: Yelavit Sattantar; Victory of the Nationalist Front