येळापूर, कोकरूड, बिळाशीत कौले, पत्रे उडून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:28 IST2021-05-06T04:28:37+5:302021-05-06T04:28:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोकरुड : शिराळा तालुक्यातील येळापूर, कोकरूड, बिळाशी, शेडगेवाडी परिसरांत बुधवारी दुपारी झालेल्या वादळी वाऱ्याने घरांच्या तसेच ...

Yelapur, Kokrud, Bilashit Kaule, leaves flew away | येळापूर, कोकरूड, बिळाशीत कौले, पत्रे उडून गेले

येळापूर, कोकरूड, बिळाशीत कौले, पत्रे उडून गेले

लोकमत न्यूज नेटवर्क

कोकरुड : शिराळा तालुक्यातील येळापूर, कोकरूड, बिळाशी, शेडगेवाडी परिसरांत बुधवारी दुपारी झालेल्या वादळी वाऱ्याने घरांच्या तसेच जनावरांच्या गोठ्यांच्या छतांवरील कौले, पत्रे उडून गेले.

दुपारी साडेतीनच्या सुमारास पाऊस सुरू झाल्यानंतर चार वाजता भर पावसात वादळी वारे होऊन येळापूर येथील शिवाजी बाबूराव पाटील यांच्या घरावरील कौले उडून गेली. दुकानाचेही पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर महादेव पोतदार, मारुती पाटील यांच्या घरांवरील कौले व पत्रे उडून गेले. चिंचोली येथील हौसाबाई थोरात यांच्या घरावरील छत उडून गेल्याने एक लाखाचे नुकसान झाले आहे. कोकरूड, शेडगेवाडी, हत्तेगाव, मेणी परिसरातील घरांची कौले, पत्रे, झाडे व फांद्या मोडून पडल्या आहेत. येळापूरहून वाकुर्डे बुद्रुकला जाणाऱ्या मार्गावरील विजेच्या तारा तुटल्याने विद्युतप्रवाह खंडित झाला आहे.

Web Title: Yelapur, Kokrud, Bilashit Kaule, leaves flew away