सांगलीतील यंदाची मावळा रॅली स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:15 IST2021-02-20T05:15:43+5:302021-02-20T05:15:43+5:30

सांगली : शिवजयंतीनिमित्त दरवर्षी काढण्यात येणारी मावळा रॅली शासन व प्रशासनाच्या निर्देशामुळे स्थगित केली आहे. शुक्रवारी मावळा प्रतिष्ठानतर्फे मारुती ...

This year's Mavla rally in Sangli postponed | सांगलीतील यंदाची मावळा रॅली स्थगित

सांगलीतील यंदाची मावळा रॅली स्थगित

सांगली : शिवजयंतीनिमित्त दरवर्षी काढण्यात येणारी मावळा रॅली शासन व प्रशासनाच्या निर्देशामुळे स्थगित केली आहे. शुक्रवारी मावळा प्रतिष्ठानतर्फे मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले जाईल. तसेच कोरोनाचे संकट टळू दे, असे साकडे यावेळी घातले जाणार असल्याची माहिती मावळा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक उद्योजक समीर पाटील, सौ. स्मिता पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली.

ते म्हणाले, शिवजयंतीनिमित्त आयोजित मावळा रॅली आणि उत्सवाला परवानगी मिळेल, अशी अपेक्षा होती. त्यादृष्टीने गेल्या काही दिवसांपासून जय्यत तयारी केली होती. लेसर शो, मर्दानी खेळ, शोभेच्या दारूची आतषबाजी आणि भव्य मिरवणूक असे नियोजन होते. परवानगी मिळावी, यासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलनही केले. परंतु शासन आणि प्रशासनाने शिवजयंती मिरवणूक आणि उत्सवावर निर्बंध लादले. प्रशासनाकडे हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीची परवानगी मागितली होती. तीदेखील नाकारली.

त्यामुळे यंदाची मिरवणूक स्थगित केली आहे. शुक्रवारी मोजक्‍या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सकाळी ११ वाजता अभिवादन केले जाईल. पारंपरिक वेशभूषेत सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करतील. कोरोनाचे संकट टळण्यासाठी साकडे घातले जाईल. तसेच आगामी काळात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदी सणापूर्वीच कोरोनाचे संकट टळू दे, अशी प्रार्थना केली जाईल, असेही ते म्हणाले.

चौकट-

धोरणाचा निषेध-

मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऋषिकेश पाटील म्हणाले, नुकतेच विधानपरिषद, ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. मात्र शिवजयंतीच्यावेळीच कोरोनाचे कारण देत निर्बंध आणले. सत्ताधारी मंडळींच्या धोरणाचा तसेच विरोधकांनीदेखील परवानगीसाठी प्रयत्न न केल्यामुळे निषेध व्यक्त करतो.

Web Title: This year's Mavla rally in Sangli postponed