शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

यंदाच्या वर्षी शेतीचे विक्रमी उत्पादन होईल : विश्वजीत कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 16:11 IST

Vishwajeet Kadam Sangli : राज्य सरकारकडून राबवलेल्या कृषी धोरणांमुळे महाराष्ट्रात गतवर्षी १२ टक्क्यांनी शेतीचे उत्पन्न वाढले आहे. यंदाच्या वर्षीही चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज असल्याने आधुनिक पद्धतीने खरीपाचे नियोजन शासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी शेतीचे विक्रमी उत्पादन होईल,असा विश्वास कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देयंदाच्या वर्षी शेतीचे विक्रमी उत्पादन होईल : विश्वजीत कदमसांगलीतील नमराह कोरोना सेंटरला दिली सदिच्छा भेट

सुरेंद्र दुपटेसंजयनगर/सांगली : राज्य सरकारकडून राबवलेल्या कृषी धोरणांमुळे महाराष्ट्रात गतवर्षी १२ टक्क्यांनी शेतीचे उत्पन्न वाढले आहे. यंदाच्या वर्षीही चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज असल्याने आधुनिक पद्धतीने खरीपाचे नियोजन शासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी शेतीचे विक्रमी उत्पादन होईल,असा विश्वास कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे.सांगलीतील नमराह कोरोना सेंटर या ठिकाणी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी सदिच्छा भेट दिली आहे. यावेळी ते म्हणाले, शहरासह ग्रामीण भागात आज अनेक कोरोना विलगीकरण कक्ष सुरू आहेत. त्या ठिकाणी रूग्णांच्या करमणुकीसाठी प्रयत्न करणार आहोत.

आज जे कलाकार काम नसल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेले आहेत, त्यांनाही आर्थिक मदत देण्याबाबत राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी युवा नेते डॉ. जितेश कदम, नगरसेवक संतोष पाटील, नगरसेवक मंगेश चव्हाण, अभिजित भोसले, जावेद नायकवडी, रहीम मुल्ला, इरशाद सोलापुरे, डाँ.रौफ मुल्ला, मुन्ना पटेकरी, छोटू ऐनापुरे आदी उपस्थित होते.मंत्री कदम पुढे म्हणाले, यंदाच्या वर्षी हवामान खात्याकडून वेळेत मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारकडून जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खरिपाच्या बैठकी पार पडलेल्या आहेत. योग्य त्या सूचना सर्व पातळ्यांवर देण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांना लागेल, त्या गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तर गेल्या वर्षी महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये शेतीचे 12 टक्के उत्पन्न वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा शासनाकडून आधुनिक पद्धतीने उपाययोजना करण्यात येत आहेत त्याचबरोबर चांगला पाऊस यामुळे यंदाच्या वर्षी राज्यात शेतीचा विक्रमी उत्पादन होईल, असा विश्वास विश्वजीत कदम यांनी यावेळी व्यक्त केला आहे.केंद्र सरकारवर दाबव आणला पाहिजेमराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही आघाडी सरकारची इच्छा आहे. त्यासाठी सरकारकडून पावले टाकण्यात येत आहेत आणि भविष्यातही टाकली जातील. कायद्याने आरक्षण कसे घेता येईल याची चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्याबद्दल आदर आहे. पण आंदोलन हा वेगळा विषय आहे. सर्वानी राज्य सरकार सोबत चर्चा चालू ठेवून केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे, असे मत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले. 

टॅग्स :Vishwajeet Kadamविश्वजीत कदमFarmerशेतकरीSangliसांगलीAgriculture Sectorशेती क्षेत्र