दहा वर्षे संचालकपद नसल्याने यंदा कामेरीतून इच्छुकांची भाऊगर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:20 IST2021-05-31T04:20:49+5:302021-05-31T04:20:49+5:30
कामेरी : कृष्णा साखर कारखान्यात सहकार पॅनलकडून इच्छुकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे उमेदवारी देताना नेत्यांना तारेवरची कसरत ...

दहा वर्षे संचालकपद नसल्याने यंदा कामेरीतून इच्छुकांची भाऊगर्दी
कामेरी : कृष्णा साखर कारखान्यात सहकार पॅनलकडून इच्छुकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे उमेदवारी देताना नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
कामेरी (ता. वाळवा) गावाला १० वर्ष संचालकपद नाही. त्याअगोदर रयत पॅनलकडून सर्जेराव तुकाराम पाटील यांनी दीर्घकाळ संचालकपद व काही काळ कारखान्याचे अध्यक्षपदही भूषविले होते. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित पाटील यांनी भैरवदेव पतसंस्थेचे संस्थापक सुनील भीमराव पाटील यांच्यासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे. मात्र, रणजित पाटील यांच्या विरोधी गटाकडून इस्लामपूरमधून कोणाला उमेदवारी मिळते, यावर हालचाली ठरणार आहेत.
सध्या संस्थापक पॅनलकडून पोपट कदम यांनी अर्ज दाखल केला आहे. रयत पॅनलकडून प्रा. अनिल पाटील किंवा छायाताई पाटील इच्छुक आहेत. कामेरी गावात कृष्णा कारखान्याचे सातशेवर सभासद आहेत.