देवराष्ट्रेत यशवंत हायस्कूलने साकारला यशवंतरावांचा जीवनपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:49 IST2021-03-13T04:49:02+5:302021-03-13T04:49:02+5:30
देवराष्ट्रे : यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत देवराष्ट्रे येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलने यशवंतराव चव्हाण यांचा जन्म ते मृत्यूपर्यंतचा ...

देवराष्ट्रेत यशवंत हायस्कूलने साकारला यशवंतरावांचा जीवनपट
देवराष्ट्रे : यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत देवराष्ट्रे येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलने यशवंतराव चव्हाण यांचा जन्म ते मृत्यूपर्यंतचा जीवनपट चित्ररूपाने साकारला आहे. देवराष्ट्रे व सोनहिरा परिसरात या नावीन्यपूर्ण उपक्रमाची चर्चा होत असून अनेकजण या ठिकाणी भेट देत आहेत.
यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेत शाळेच्या प्रवेशद्वारात असलेल्या हॉलमध्ये यशवंतराव चव्हाण यांचा जीवनपट साकारला आहे. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म, बालपण, शैक्षणिक जीवन, इंग्रजाच्याविरुद्ध उभारलेला लढा, राजकारण यांनी घेतलेले ऐतिहासिक निर्णय, सांसारिक जीवन, तसेच त्याच्या अखेरच्या श्वासापर्यंतचा जीवनपट साकारला आहे.
ग्रामीण भागाशी नाते निभावत आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांनी केलेल्या अनेक कार्याचे चित्ररूप दर्शन शेकडो फोटोंच्या माध्यमातून साकारले आहे. तसेच साहित्यिक असलेल्या यशवंतरावांच्या जीवनावर आधारित काव्य पंक्ती विशेषतः चर्चेचा विषय ठरला आहे
यशवंतराव हे कोणत्या परिस्थितीमध्ये घडले व त्यांचे राष्ट्र व राज्य निर्माण करण्यासाठी केलेले कार्य आजच्या पिढीला समजावे या उद्देशाने शाळेत यशवंतराव चव्हाण यांचा जीवनपट साकारला आहे.