शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

थकीत पगारासाठी यशवंत कारखान्याच्या कामगारांचा विट्यात महामोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 18:17 IST

गेल्या ३५ दिवसांपासून विटा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

दिलीप मोहिते विटा : नागेवाडी (ता.खानापूर) येथील यशवंत साखर कारखान्याच्या कामगारांनी थकीत पगार मिळावा, या मागणीसाठी गेल्या ३५ दिवसांपासून विटा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जिल्हा बँकेकडे असलेले पगाराचे पैसे कामगारांना देण्यास बँक व्यवस्थापन टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ कामगारांनी काल, सोमवारी कुटुंबियांसह विटा तहसील कार्यालयावर महामोर्चा काढला. यावेळी आक्रमक झालेल्या कामगारांनी बँक व्यवस्थापना विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत शहर दणाणून सोडले.विटा तहसील कार्यालयासमोर दि. १ फेब्रुवारीपासून कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. यशवंत कारखान्याच्या कामगारांचे ८ कोटी २८ लाख रूपये जिल्हा बँकेत आहेत. ते पैसे बँक वापरत आहे. परिणामी, कामगार व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे पैसे तातडीने मिळावेत, या मागणीसाठी गेल्या ३५ दिवसांपासून आंदोलन सुरू असूनही त्याकडे प्रशासनासह बँक व्यवस्थापन दुर्लक्ष करीत आहे.यापार्श्वभूमीवर आक्रमक झालेल्या कामगारांनी शेतकरी सेनेचे अध्यक्ष भक्तराज ठिगळे, शेकापचे सरचिटणीस अ‍ॅड. सुभाष पाटील, भाऊसाहेब यादव, आनंदराव नलवडे, गोपाळ पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी तहसीलवर महामोर्चा काढला. यशवंतराव चव्हाण पुतळ्यापासून सुरू झालेला हा महामोर्चा मायणी रोड, पेट्रोलपंप, प्रसाद चित्रमंदीर, क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला.त्यावेळी कामगारांनी रस्त्यावरच ठाण मांडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. यावेळी कामगारांनी आपल्या भावना तीव्र शब्दात मांडल्या. बँकेने थकीत पगाराचे पैसे कामगारांना द्यावेत, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगार संघटनेने दिला. यानंतर तहसीलदारांना आंदोलनकर्त्यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. या मोर्चात अरूण धेंडे, सुदाम काळे, सुखदेव कुंभार, हणमंत घोरपडे, बाळासाहेब वाघमोडे, शाहीर यादव, अनिल महाडीक यांच्यासह कामगार व त्यांचे कुटुंबिय सहभागी झाले होते.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने