प्रभाग समित्यांची पुनर्रचना चुकीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:27 IST2021-04-04T04:27:25+5:302021-04-04T04:27:25+5:30

सांगली : महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या पुनर्रचनेचा ठराव नुकताच महासभेत घेण्यात आला आहे. नव्याने केलेली ही प्रभागांची रचना पूर्णतः ...

Wrong reorganization of ward committees | प्रभाग समित्यांची पुनर्रचना चुकीची

प्रभाग समित्यांची पुनर्रचना चुकीची

सांगली : महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या पुनर्रचनेचा ठराव नुकताच महासभेत घेण्यात आला आहे. नव्याने केलेली ही प्रभागांची रचना पूर्णतः चुकीची व भौगोलिक संलग्नतेचा विचार न करता केलेली असून त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होणार आहे. याप्रकरणी ठराव विखंडित करण्यासाठी तक्रार दाखल करण्याचा इशारा सांगली जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष ॲड. अमित शिंदे यांनी दिला आहे.

याबद्दल ॲड. अमित शिंदे म्हणाले की, महासभेमध्ये प्रभाग समित्यांच्या पुनर्रचनेचा ठराव सत्ताधारी व विरोधकांनी सर्वानुमते मंजूर केला आहे. यामध्ये प्रभाग समितीखाली येणाऱ्या प्रभागांमध्ये अन्यायकारक फेरबदल केले आहेत. प्रभाग १९ हा पूर्वी प्रभाग समिती २ च्या कार्यालयास जोडला होता. प्रभाग समिती २ चे कार्यालयदेखील प्रभाग १९ च्या हद्दीमध्ये आहे. मात्र, आताच्या ठरावानुसार प्रभाग १९ हा कुपवाडमधील प्रभाग समिती ३ च्या कार्यालयास जोडला आहे. यामुळे अन्य प्रभागातील नागरिकांनी त्यांच्या कामासाठी प्रभाग १९ मध्ये कार्यालय असलेल्या प्रभाग २ मध्ये यायचे व विश्रामबागमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आता पालिकेतील कामांसाठी कुपवाडला हेलपाटे घालावे लागणार आहेत.

प्रभाग १४ व १६ अनुक्रमे गावभाग व खणभाग हा पूर्वी सांगली महापालिका कार्यालयातील प्रभाग समिती १ च्या कार्यलयास जोडला होता. जो तेथील नागरिकांना जवळ व सोयीचा होता. मात्र, आताच्या ठरावानुसार हे प्रभाग विश्रामबाग येथील प्रभाग समिती २ च्या कार्यलयास जोडले आहेत. त्यामुळे गावभाग व खणभागातील नागरिकांना पालिकेतील कामांसाठी आता विश्रामबागला हेलपाटे मारावे लागतील. हा अन्यायकारक ठराव तत्काळ रद्द करून नागरिकांची गैरसोय टाळावी, अन्यथा याविरुद्ध नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवून कायदेशीर मार्गाने ठराव विखंडित करण्यासाठी लढा उभारू, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात झालेल्या सुधार समितीच्या बैठकीस सुधीर भोसले, गोरख पाटील, प्रशांत साळुंखे, दत्ता पाटील, प्रकाश खोत, नितीन शिंदे, सद्दाम खाटीक, अझीम पठाण, जयंत जाधव, महालिंग हेगडे, संजय बनसोडे, बाळासाहेब कुमे उपस्थित होते.

Web Title: Wrong reorganization of ward committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.