सांगलीत पोलीस भरतीसाठी २१ व २३ सप्टेंबरला लेखी परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:33 IST2021-09-10T04:33:42+5:302021-09-10T04:33:42+5:30
सांगली : जिल्ह्यातील ७७ चालक पोलीस शिपाई आणि १०५ शिपाई पदासाठी येत्या २१ आणि २३ सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा ...

सांगलीत पोलीस भरतीसाठी २१ व २३ सप्टेंबरला लेखी परीक्षा
सांगली : जिल्ह्यातील ७७ चालक पोलीस शिपाई आणि १०५ शिपाई पदासाठी येत्या २१ आणि २३ सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी शुक्रवारी दिली.
ते म्हणाले की, २०१९ मध्ये जाहीर झालेल्या पोलीस भरती कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. ७७ चालक आणि १०५ शिपाई पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार यंदा प्रथम लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानुसार चालक पदासाठी २१ सप्टेंबरला, तर शिपाई पदासाठी २३ सप्टेंबर रोजी परीक्षा होईल. उमेदवारांना संकेतस्थळावर १४ सप्टेंबर रोजी प्रवेश पत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. सांगली महापालिका क्षेत्रातील केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्र ऑनलाईन डाउनलोड करून घ्यावे.